सातारा : अवैधरित्या दारू विक्री केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एका महिलेवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक एक रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास गीता लक्ष्मण भोरे रा. आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा ही महिला जुना मोटर स्टॅन्ड परिसरातील जुनी भाजी मंडई जाणाऱ्या बोळात अवैधरित्या दारू विक्री करताना आढळून आली. तिच्याकडून 385 रुपये किंमतीच्या देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत.