सातारा : बोगदा येथील अपघात प्रकरणी बस चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 23 रोजी संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास सज्जनगड सातारा रस्त्यावर असणाऱ्या बोगदा चौकाच्या अलीकडे बस क्रमांक एमएच 20 बीएल 4271 चे चालक पंडित विक्रम सोनवणे (रा. निरा, ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी त्यांच्या ताब्यातील बस धोकादायक पद्धतीने, निष्काळजीपणे चालवून तक्रारदार विक्रम श्रीरंग आवळे ( रा. आरे तर्फ परळी ता. सातारा) यांचा भाचा करण संग्राम देवकुळे (रा. आरे तर्फ परळी, ता. सातारा) याच्या दुचाकीस पाठीमागून धडक देऊन अपघात केला. त्या अपघातात करण देवकुळे याचा मृत्यू झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.