सातारा : मारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पतंग उडवण्याच्या कारणातून मारहाण झाल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. प्रमोद बबन चव्हाण (वय 48, रा.जकातवाडी ता.सातारा) यांनी आदित्य आवळे याच्याविरुध्द तक्रार दिली आहे. ही घटना दि. 28 डिसेंबर रोजी जकातवाडी येथे घडली आहे. तक्रारदार यांच्या मुलाला ही मारहाण झाली आहे.