सातारा : बेकायदा गुटखा विक्री प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, राज्यात विक्रीसाठी बंदी असलेला गुटखा, पान मसाला आपल्या राहुल पान शॉप, शेटे चौक, सातारा या दुकानात दि. 27 रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास विक्रीसाठी ठेवल्या प्रकरणी सुरज बाजीराव मस्कर (रा. गोडोली, सातारा) याच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 11 हजार 700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.