नामनिर्देशन प्रक्रियेला आजपासून सुरवात

by Team Satara Today | published on : 21 October 2024


सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारपासून रणधुमाळी सुरू होत असून प्रत्यक्षात अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. यामुळे पहिल्या दिवशी अर्ज कोण-कोण भरणार, त्यामध्ये दिग्गज असणार का ? याकडे लक्ष लागलेले आहे. तर निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्यात भाजप आणि वंचित बहुजन आघाडीने आघाडी घेतलेली आहे.

विधानसभा निवडणूक जाहीर होऊन सहा दिवस होऊन गेले आहेत. तरीही अजून महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चीत नाही. काही जागांवर एकमत असलेतरी अनेक जागांचा तिढाच आहे. त्यामुळे दावे-प्रतिदावे असणाऱ्या जागां वाटपाचं गुऱ्हाळ सुरूच आहे. त्यातच महायुतीत विद्यमान आमदारांचे मतदारसंघ त्याच पक्षाकडे राहणार हे जवळपास स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपने पहिली यादी प्रसिध्द करीत सातारा जिल्ह्यातील तीन मतदारसंघाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विद्यमान दोन आमदारांवरच पुन्हा शिक्कामोर्तब केलंय. तसेच कऱ्हाड दक्षिणमध्ये भाजपने पुन्हा अतुल भोसले यांनाच पसंदी दिली आहे.

आता मंगळवारपासून प्रत्यक्षात निवडणुकीला सुरूवात होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी अर्ज भरण्यासाठी कोण-कोण पुढे येणार हे पाहणे महत्वाचे आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवपदी अ‍ॅड. कमलेश पिसाळ
पुढील बातमी
अवैध दारू प्रकरणी दोन कारवाया

संबंधित बातम्या