नाशिक : नाशिकमध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका कांदा पिकांना बसला आहे. या अवकाळी पावसाने द्राक्ष बागांचे देखील नुकसान झालेले आहे. त्यातच आता कांदा उत्पादनाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
सध्या शेतकऱ्यांचा कांदा हा साठवणूक करण्यासाठी आणि बाजारात विक्रीसाठी आणायला तयार होता. मात्र गेल्या आठवडाभरात सतत असलेलं ढगाळ वातावरण आणि वादळीवाऱ्यांसह झालेल्या अवकाळी पावसाने या कांद्याची पुरती वाट लावली आहे. सध्याच्या हवामानामुळे जमिनीतील ओलावा वाढल्याने कांद्याच्या साठवणुकीवर परिणाम झाला आहे. कांद्याला ओल लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार आहे. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला असून त्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.