कोळकीत जुन्या वादातून तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला; पोटाला गंभीर दुखापत, फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 26 September 2026


फलटण : कोळकी येथील अनंत मंगल कार्यालयासमोरील मैदानात जुन्या वादाच्या कारणावरून ३० वर्षीय तरुणावर धारदार लोखंडी हत्याराने हल्ला केल्याची घटना शुक्रवार, दि. २५ सप्टेंबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. या हल्ल्यात रोहन बाळू शिंदे (वय ३०, रा. बुवासाहेबनगर, कोळकी) हा गंभीर जखमी झाला आहे.
याप्रकरणी रोहनची आई सुनिता बाळू शिंदे (वय ५४) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरी जबाबावरून सचिन किसन हजारे (रा. बुवासाहेबनगर, कोळकी) याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
तक्रारीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री रोहन हा त्याचे मित्र स्वागत महादेव काशीद, दिनेश शिंदे व रणजीत काशीद यांच्यासोबत अनंत मंगल कार्यालयासमोरील मैदानात गप्पा मारत उभा होता. त्यावेळी सचिन हजारे तेथे आला. रक्षाबंधन सणाच्या दिवशी झालेल्या जुन्या वादाचा उल्लेख करून त्याने रोहनला शिवीगाळ व दमदाटी केली आणि हाताने मारहाण केली. त्यानंतर धारदार लोखंडी हत्याराने रोहनच्या पोटाच्या डाव्या बाजूस वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
हल्ल्यात रोहन गंभीर जखमी झाल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला फलटण येथील निकोप हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्याची आई वडिलांसह रुग्णालयात पोहोचली. रोहनची प्रकृती अशी असल्याने तो व्यवस्थित बोलू शकत नसल्याचे नमूद करून त्याच्या आईने स्वतः पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास फलटण शहर  पोलीस ठाण्यातचे  पोलीस उपनिरीक्षक विजयमाला गाजरे  करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पंचनामे व परिस्थितीनुसार दुष्काळग्रस्त तालुक्यांची संख्या वाढविणार - चंद्रशेखर बावनकुळे : गरज भासल्यास डीपीडीसीचा निधीही दुष्काळ निवारणासाठी वळविण्याची तयारी
पुढील बातमी
इराणसोबत शांततेचा प्रस्ताव ट्रम्प यांनी धुडकावला, होर्मुझचे नामकरण करून सांगितलं युद्ध पुन्हा कधी सुरू होणार; ट्रम्प यांच्यावर करार मोडल्याचा आरोप

संबंधित बातम्या