सातारा, दि. ११ : सातारा जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेतर्फे सार्वजनिक ग्रंथालीन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्न संदर्भात निवासी जिल्हाधिकारी नागेश पाटील यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात यावेळी 40 टक्के अनुदान वाढीचा शासन निर्णय लवकरात लवकर निघावा ग्रंथालयाचे दर्जा वर्ग बदल करण्यात यावेत. ग्रंथालय अधिनियम 1967 मध्ये काल सुसंगत सुधारणा करण्यात यावी ग्रंथालय कर्मचारी यांचे काम सहा तास ऐवजी आठ तास करण्यात यावी, ग्रंथालय अधिनियम 1967 मध्ये सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांना शैक्षणिक पात्रतेनुसार वेतनश्रेणी करावी किंवा किमान वेतन दरमहा त्यांच्या खात्यावर जमा करावे, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याप्रमाणे शासन मान्य सार्वजनिक ग्रंथालयातील कर्मचारी यांना सेवाशर्ती नियमावली लागू करणे, ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी दहा टक्के वाढ करावी, विमा हॉस्पिटलच्या माध्यमातून ग्रंथालय कर्मचारी यांना वैद्यकीय सेवेचा लाभ मिळावा ,ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असंघटित कामगारांचा दर्जा द्यावा वरील सर्व मागण्या लवकरात लवकर मंजूर करण्याबाबत करण्यात याव्यात या मागण्या करण्यात आल्या आहेत.
यावेळी सातारा जिल्हा ग्रंथालय सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे अध्यक्ष संजय जंगम, मारूती भोसले, हेमंत बर्गे, सुनील भोसले, राजेश्वर मांडवे, सौ. पार्वती पवार, सौ. अर्चना घाडगे सौ. आरती जाधव, सौ. मंगल जंगम, शकुंतला कारंडे, रोहिणी राव, डॉ. राजेंद्र साबळे, सौ. सीता जगताप, राजेंद्र माने, सुर्याजी देवकर, विकास माने, सौ. सुनीता कांबळे, अरुण जयकर, सौ.ज्योती गुरव , सौ. सीता जगताप, संतोष लाड, कोमल कुंडलकर जिल्ह्यातील व कर्मचारी उपस्थित होते.