आपल्या आयुष्यात वेगवेगळे मार्ग येत असतात, पण सगळ्यात महत्त्वाचा आयुष्यातील प्रवास असतो तो, जो तुम्हाला तुमच्या मूळ अस्तित्वाकडे, तुमच्या खऱ्या उद्देशाकडे घेऊन जाण्याचा जिथे भविष्य रूजण्याच्या प्रतीक्षेत असते. ॲमेझॉन एमएक्स प्लेयर या ॲमेझॉनच्या मोफत स्ट्रीमिंग सेवेद्वारे अश्याच एका प्रवासाची गोष्टी असलेली मालिका ‘मिट्टी’ घेऊन येत आहे. या सीरीजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या सीरीजमध्ये जबरदस्त कलाकारांनी काम केलं असून त्यात इश्वाक सिंग, श्रृती शर्मा, दीक्षा जुना, योगेंद्र टिकु आणि अल्का अमिन यांसारखे कलाकार काम करताना दिसणार आहेत.
हा ट्रेलर प्रेम आणि परंपरावर आधारित स्थित्यंतराच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या जगाची प्रेरणादायी झलक दाखवणारा आहे. यातल्या कथेत राघव नावाचा यशस्वी पत्रकार महत्वाची भूमिका साकारणार आहे. राघव परत त्याच्या गावी, घरी जातो तेव्हा त्याची दुनियाच बदलते. आजोबांना निरोप देण्यासाठी सुरू झालेला त्याचा प्रवास त्याच्या जीवनाचा उद्देश, तिथले लोक आणि एकेकाळी त्याने सोडून दिलेली जमीन यांच्यासह असलेलं नातं परत नव्यानं निर्माण करण्यासाठी तिथे येतो. ही सीरीज ग्रामीण भारताला सलाम करणारी आपल्या पायाखालची मातीच आपल्याला जीवनाला आकार देत असते याची जाणीव करून देणारी आहे.
ॲमेझॉन एमएक्स प्लेयरच्या कंटेंट विभागाचे प्रमुख आणि संचालक अमोघ दुसाद म्हणाले, ‘मिट्टी ही सीरीज भारताच्या ग्रामीण भागाची ताकद आणि प्रेमाला सलाम करणारी आहे. ही गोष्ट फक्त आपल्या मुळांपाशी परत जाण्याची नाही, तर आपल्या स्वतःच्याच प्रवासात गावात क्रांती घडवून आणण्याचीही गोष्ट आहे. मिट्टीमध्ये वेगवेगळ्या भावना, महत्त्वाकांक्षा आणि त्यांचे परिणाम यांचा अनोखा मेळ पाहायला मिळणार आहे.’ मिट्टी सीरीजमधल्या भावनांची गुंतागुंत अनुभवण्यासाठी सज्ज व्हा. ही सीरीज 10 जुलैपासून ॲमेझॉन एमएक्स प्लेयवर मोफत पाहाता येणार आहे. ही सीरीज स्वतंत्र अॅप, अॅमेझॉन शॉपिंग अॅप, प्राइम व्हिडिओ, फायर टीव्ही, स्मार्ट टीव्ही आणि एयरटेल एक्स्ट्रीमद्वारे उपलब्ध केली जाणार आहे.