फलटण : पिंपरद, ता. फलटण येथे हातभट्टीच्या दारुवर फलटण ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पिंपरद गावाच्या हद्दीत कारवाई करण्यात आली. पोलिसांनी हातभट्टीची दारु जप्त केली. तसेच याप्रकरणी शंभू रमेश चव्हाण (रा. पिंपरद) याच्यावर कारवाई करण्यात आली.