मुंबई : मुंबईमध्ये सर्वत्र बाप्पाच्या मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू असतानाच एक धक्कादायक अशी घटना घडली आहे. लालबाग राजाच्या परिसरात भीषण अपघात झाला आहे. ज्यामध्ये दोन चिमुरड्यांना चिरडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लालबाग राजाच्या मिरवणुकीला काही वेळ शिल्लक असतानाच ही घटना घडली आहे.
आज गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या जल्लोषात भाविक आहेत. सकाळपासूनच एक लगभग रस्त्यावर बघायला मिळत आहे. आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले आहेत आणि एक वेगळाच उत्साह बघायला मिळत आहे. मात्र, बाप्पाला निरोप देत असतानाच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. लालबाग राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीच ही घटना लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशव्दाराच्या समोर घडली. लालबाग राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरील मार्गावर अज्ञात वाहनाने दोन चिमुकल्यांना चिरडल्याने खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, ही दोन्ही मुलं फुटपाथवर झोपली होती. यामधील एका मुलाचा मृत्यू झाला आहे आणि एक जण गंभीर जखमी आहे.