संभाजीनगर येथे घरफोडी; 76 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास, अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 November 2026


सातारा : संभाजीनगर येथे अज्ञाताने घरफोडी करून 76 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान दिनकर पांडुरंग नाईक (रा. संभाजीनगर, एमआयडीसी, सातारा) यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील 76 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास महिला पोलीस हवालदार देखणे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जैतापूर येथे एकास मारहाण प्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा
पुढील बातमी
नदी ओलांडून जात असताना नदीपात्रात बुडल्याने रामकृष्ण नगर येथील एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या