कोरेगाव येथे 29 रोजी महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन; बेरोजगारांनी लाभ घेण्याचे आवाहन; जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद

by Team Satara Today | published on : 21 September 2026


सातारा : सध्याच्या बदलत्या काळात नोकरीसाठी अनुभवासोबतच आधुनिक कौशल्यांची नितांत गरज निर्माण झाली आहे. बाजारात उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी स्थानिक तरुणांना मिळवून देण्यासाठी येत्या २९ सप्टेंबर रोजी कोरेगाव दर्पण कॉम्प्युटर येथे महाकुंभ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोरेगाव तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास कार्यालयातील धनाजी बागल यांनी केले आहे.
कोरेगाव येथील दर्पण काम्प्युटर येथे जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने लोकसंवाद-2026 कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी हेमंतकुमार चव्हाण, दर्पण काम्प्युटरचे संस्थापक संतोष नलावडे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
या मेळाव्याच्या माध्यमातून स्थानिक तरुणांना विविध क्षेत्रांतील रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आधुनिक उद्योगजगताला अपेक्षित असलेले कौशल्यपूर्ण मनुष्यबळ आणि रोजगाराच्या शोधात असलेले तरुण यांच्यातील दुवा साधण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे.
कोरेगाव तालुक्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी आपल्या अनुभवाला आणि शिक्षणाला योग्य संधी मिळवून देण्यासाठी या महाकुंभ रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. बागल यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत पाटण तालुक्यात विविध उपक्रमांना गती; शासनाच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत
पुढील बातमी
सेवा संकल्प अभियानांतर्गत कराड येथे महिला सक्षमीकरण आणि विविध योजनांबाबत मार्गदर्शन

संबंधित बातम्या