आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून सायबर भामट्याचा क्षेत्र माहुली येथील महिलेला ८.६० लाखांचा ऑनलाइन गंडा

by Team Satara Today | published on : 22 November 2026


सातारा :  पोलिस अधिकारी असल्याची बतावणी करून बँक खात्यातील पैशांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने सायबर भामट्याने क्षेत्र माहुली येथील महिलेला ८ लाख ६० हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. व्हिडिओ कॉलद्वारे विश्वास संपादन करून संबंधित रक्कम परस्पर खात्यात वळवण्यात आली. याप्रकरणी विद्या रामजी पवार (वय ५२) यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
विद्या पवार यांना ३० सप्टेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत दोन वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकांवरून फोन आले. सुरुवातीला फोन करणाऱ्याने आपण पोलिस हवालदार असल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरून व्हिडिओ कॉल करण्यात आला. संबंधित व्यक्तीने आपण आयपीएस मनोज शर्मा असल्याची ओळख करून दिली.
बँक खात्यातील रकमेची पडताळणी करायची असून, काळ्या पैशासंदर्भात चौकशी सुरू असल्याचे सांगून त्याने पवार यांना विश्वासात घेतले. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून आरटीजीएसद्वारे प्रथम ५ लाख ६० हजार रुपये आणि त्यानंतर आणखी ३ लाख रुपये स्वतःच्या खात्यात वळवून घेतले.
आपली आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पवार यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलिस निरीक्षक एस. जी. म्हेत्रे तपास करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेंद्रेत चारचाकीतून गांजाची वाहतूक; २५ किलोचा साठा जप्त, सातारा तालुका पोलिसांची कामगिरी
पुढील बातमी
कोंडव्यात घर फोडून सोन्याचे ४० हजार रुपये किमतीचे नाणे लंपास; सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या