कराड : शेतकऱ्यांबाबत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ कराडमध्ये युवक काँग्रेसने आक्रमक आंदोलन केले. आंदोलनासाठी आणलेल्या आमदार गायकवाड यांच्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवण्यात आले होते. भर चौकात त्या पुतळ्याचे कुत्र्यांनी लचके तोडल्याने आंदोलनातील प्रसंग लक्षवेधी ठरला.
आंदोलनात युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवार यांच्यासह एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय जमाले, उपजिल्हाध्यक्ष समीर इनामदार, कराड तालुकाध्यक्ष देवदास माने, माण-खटाव तालुकाध्यक्ष महेश करचे, कराड दक्षिण तालुकाध्यक्ष चैतन्य पाटील, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष रविराज पाटील, कऱ्हाड दक्षिणचे उपाध्यक्ष मयूर पाटील, एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष नवतेज पवार, उपाध्यक्ष तौफिक सय्यद, मुकुंद पाटील, गणेश सूर्यवंशी, जितेंद्र यादव, महेश पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकरी देशाचा पोशिंदा आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या शेतकऱ्यांविषयी सत्ताधारी पक्षाच्या आमदाराने अशा प्रकारचे वक्तव्य करणे निंदनीय आहे, अशी भूमिका युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार यांनी मांडली. शेतकऱ्यांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे सांगत त्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र शब्दांत निषेध केला.
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करून आमदार गायकवाड यांच्या वक्तव्याविरोधात नाराजी व्यक्त केली. आंदोलनासाठी तयार केलेल्या पुतळ्याला मांसाचे तुकडे अडकवण्यात आले होते. त्यानंतर भर चौकात कुत्र्यांनी पुतळ्याचे लचके तोडल्याने या आंदोलनाची परिसरात चर्चा झाली.
शेतकऱ्यांबाबत आ. गायकवाड यांनी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या निषेधार्थ कराडमध्ये आक्रमक आंदोलन
भर चौकात कुत्र्यांनी पुतळ्याचे लचके तोडल्याने युवक काँग्रेसचच्या आंदोलनाची परिसरात चर्चा
by Team Satara Today | published on : 29 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा