अवैध गौणखनिज उत्खनन व वाहतूक प्रकरणी दंडात्मक थकीत प्रकरणामध्ये जाहिर लिलाव

by Team Satara Today | published on : 28 August 2024


सातारा : सातारा तालुक्यात अवैध व विनापरवाना उत्खनन व वाहतूक होणा-या गौणखनिज प्रकरणांमध्ये वेळोवेळी दंडात्मक कारवाया महसूल प्रशासनामार्फत करण्यात येतात. मात्र दंडाच्या कारवाईचे आदेश झाल्यानंतरही अनेक व्यक्ती कसूरदार असूनही दंडाची रक्कम भरण्यास टाळाटाळ करतात व शासनाच्या आदेशाकडे हेतूपुरस्कर दुर्लक्ष करतात. 

अनेक महिन्यांपासून वसूली प्रलंबित असणा-या उपप्रादेशीक परिहवन अधिकारी सातारा यांच्याकडे विना नोंदणी असलेल्या अशा अनुक्रमे इलेक्ट्रीक मोटरसह लोंबडी ट्रॉली ०३, लोंखडी यारी -०३, विना नंबर ट्रॅक्टर ट्रॉली ०७, विना नंबर ट्रॅक्टर-०४, लोंखडी बोट ०१, लोंखडी जाळी ०२ अशी वाहने व इतर यंत्र सामुग्रीमधील प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम गुंतलेली असून उपप्रादेशीक परिवहन अधिकारी सातारा यांच्याकडे नोंदणीकृत असलेली एकूण ४ वाहनांमध्ये एकूण ११ लाख ५९ हजार ५६ इतक्या रकमेच्या वसूलीसाठीचे सर्व कायदेशीर उपाययोजना करुनही दंडाची रक्कम वसूल न झाल्याने उपविभागीय अधिकारी सातारा सुधाकर भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार संबंधीत दंड रक्कम थकबाकीदारांच्या वाहनांचा व इतर यंत्र सामुग्रीचा लिलाव करून दंडाची रक्कम धडक कारवाईद्वारे वसूल करण्यात येणार असल्याचे सातारा तहसिलदार नागेश गायकवाड यांनी सांगितले. तसेच अनाधिकृत वाहनांच्या जप्त करण्यात आलेल्या वर नमूद प्रकरणांमध्ये लिलाव प्रक्रिया दि. ०३ सप्टेंबर २०२४ रोजी तहसिल कार्यालय सातारा आवारात करण्यात येणार आहे, असे तहसिलदार सातारा यांनी कळविले आहे.

 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जात पडताळणी समितीचे दोन दिवस त्रुटी पुर्तता शिबीर
पुढील बातमी
शिवरायांच्या पुतळ्याशी संबंधित अन्य कोणतेही काम माझ्याकडे नव्हते : स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील 

संबंधित बातम्या