सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने मोटरसायकल चोरट्यास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्याच्याकडून सुमारे दोन लाख रुपये किंमतीच्या चार मोटरसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत.
सुरेश गोविंद जानकर वय 35, रा. दत्त मंदिराजवळ, मंगळवार पेठ, सातारा असे संबंधित मोटरसायकल चोरट्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांनी सातारा शहरातून चोरी करणाऱ्या मोटरसायकल चोरट्याचा शोध घेण्याबाबत डीबी पथकास सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे हे पथक रेकॉर्डवरील मोटरसायकल चोरट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते.
दि. 10 रोजी गस्तीदरम्यान सुरेश गोविंद जानकर यांच्याकडे एक विना नंबर प्लेटची मोटरसायकल मिळून आल्याने त्याला डीबी पथकाने ताब्यात घेऊन त्याच्याकडे संबंधित मोटर सायकल बाबत चौकशी केली असता त्याने ती चोरी केली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसोशीने चौकशी केली असता त्याने अन्य ठिकाणाहून देखील तीन मोटरसायकल चोरी केल्याचे सांगितले. अशारीतीने या मोटरसायकल चोरट्याकडून एकूण चार मोटरसायकल जप्त केल्या असून चार मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत.
या कारवाईत पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल तुषार भोसले, सागर गायकवाड, सचिन रिटे, संतोष घाडगे, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.