मेढा : संपूर्ण जावळी तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मेढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी भाजप विरुद्ध शिवसेना अशीच दुरंगी मुख्य लढत होणार असून नगराध्यक्षाच्या पदासाठी आठ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज भरले आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी उमेदवारांची मोठीच धांदल होती . त्यामुळे तहसिल कार्यालय आज गर्दीने फुलले होते.
भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ रुपाली संतोष वारागडे यांचा उमेदवारी अर्ज राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपास्थित दाखल करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे उपस्थित होते.
आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवशी ५० उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आज अखेर मेढा नगरपंचायतीच्या १७ जागेसाठी ७० उमेदवारांनी १०२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.तर नगराध्यक्षपदाच्या या एका जागेसाठी ८ उमेदवारांनी ११ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत .
यामध्ये नगराध्यक्षपदासाठी भारतीय जनता पार्टीतून रूपाली वारागडे , शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गटातून रेश्मा करंजेकर, राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटातून सुनिता पार्टे यांनी आर्ज भरले आसून अपक्ष म्हणून राधिका करंजेकर, पूजा वारागडे,सानिका सपकाळ, शुभांगी गोरे, रत्ना पवार यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केले आहेत. कोणत्या वॉडमध्ये कोणा विरुद्ध कोण याच चित्र उमेदवारी अर्ज माघार घेण्या दिवशीच स्पष्ट होणार आहे .
राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गट व शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे गट यांच्या युतीच्या चर्चा सुरू आसून नेमकी जागा कोठली कोणाला सोडायची याबाबत वाटाघाटी सुरू आहेत.