सायबर क्राइम म्हणजे इंटरनेट आणि कॉम्प्युटरच्या साहाय्याने केलेले गुन्हे, ज्यामुळे दुसर्या व्यक्तीचे आर्थिक, शारीरिक किंवा मानसिक नुकसान होऊ शकते. हे गुन्हे अनेक प्रकारचे असतात, जसे की हॅकिंग, फिशिंग, क्रेडिट कार्ड फसवणूक, सॉफ्टवेअर पायरसी इत्यादी.
हॅकिंग म्हणजे तुमच्या परवानगीशिवाय तुमच्या मोबाईल, लॅपटॉप, संगणक प्रणालीमध्ये प्रवेश करणे. सोशल इंजिनिअरिंग हा एक प्रकारचा हॅकिंग आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीच्या नावाने मेसेजेस येतात आणि तुम्ही त्या मेसेजेसमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करता. हे तीन प्रकारचे असते: उर्जितता (Urgency), भावनिक (Emotional), आणि आकर्षण (Temptation).
उर्जितता (Urgency) यात तुम्हाला असे मेसेजेस येतात ज्यामध्ये तुमच्या जवळच्या व्यक्तीला तातडीची पैशाची गरज असल्याचे सांगितले जाते. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत असल्याने तुम्ही त्यांच्या सूचनांचे पालन करण्याची शक्यता जास्त असते.
भावनिक (Emotional) यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला काही दुखापत झाली आहे किंवा त्यांना तातडीची मदत हवी आहे असे मेसेजेस येतात. तुम्ही त्या व्यक्तीला ओळखत असल्याने तुम्ही त्यांच्या मदतीला येण्याची शक्यता जास्त असते.
आकर्षण (Temptation) यामध्ये तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट वाढवण्याचे आमिष दाखवले जाते किंवा तुमच्या अकाउंटमध्ये बोनस जमा झाल्याचे सांगितले जाते. तुम्ही या आमिषाला बळी पडून तुमची वैयक्तिक माहिती शेअर करता.
सायबर क्राइम पासून सावध राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स -
1. OTP किंवा कोड शेअर करू नका : कोणत्याही परिस्थितीत तुमचा OTP किंवा कोड कोणालाही शेअर करू नका. जर तुम्हाला कोणी तो मागितला असेल तर त्या व्यक्तीला थेट फोन करून खात्री करा आणि मगच पुढची कारवाई करा.
2. टू-स्टेप व्हेरिफिकेशन : तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर टू-स्टेप व्हेरिफिकेशन सक्षम करा. हे तुमच्या अकाउंटचे सुरक्षितता वाढवते.
3. बँक अकाउंट्सचा फोन नंबर वेगळा ठेवा : तुमच्या बँक अकाउंट्सशी जोडलेला फोन नंबर इतर सोशल मीडिया अकाउंट्ससाठी वापरू नका.
4. अज्ञात फोन कॉल्स टाळा : अज्ञात किंवा बाहेरून आलेल्या फोन कॉल्सला प्रतिसाद देऊ नका. ते डिजिटल अटकेच्या प्रकारातील असू शकतात.
5. पॅनिक होऊ नका : जर तुमचा अकाउंट हॅक झाला असेल तर घाबरू नका. त्वरित कारवाई करा आणि तुमच्या मित्रांना तुमच्या अकाउंटची माहिती द्या.
सायबर क्राइम हा एक गंभीर धोका आहे ज्यापासून सावध राहणे आवश्यक आहे. हॅकिंग आणि सोशल इंजिनिअरिंग यांसारख्या गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी जागरूक राहणे आणि सुरक्षिततेचे उपाय अवलंबणे महत्त्वाचे आहे. तुम्ही सावध राहिले तरच तुम्ही सायबर क्राइमच्या धोक्यापासून वाचू शकता.
- डॉ. प्रसाद जोशी,
प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ, फलटण.