सुरक्षाव्यवस्थेचा अभाव दहशतवादी हल्ल्यास कारणीभूत : राऊत

by Team Satara Today | published on : 25 April 2025


सातारा : भारत देशाचा मुकूट अशी ओळख असलेल्या काश्मीर खोर्‍यातील ‘पहलगाम’ येथे पाक समर्थित दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला केला. परंतू सुरक्षा व्यवस्थेत मोठी चूक झाल्याने दहशतवादी हल्ला झाला आहे. अत्यंत दुर्गमी असलेल्या या पर्यटनस्थळी एवढ्या मोठ्या संख्येत पर्यटक एकाच ठिकाणी एकत्रित आले असताना पुरेशी सुरक्षा व्यवस्था का नव्हती? असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा संघटक सुधीर राऊत यांनी केला आहे.

प्रसिद्वी पत्रकात राऊत यांनी म्हटले आहे, ‘पुलवामा’ प्रमाणेच ‘पहलगाम’ येथील घटनेनंतर देशवासियांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोषाची लाट उसळली आहे. सीमा भागातील दहशतवादी तळांचा कायमचा बंदोबस्त करण्याची ‘हीच ती वेळ’ आहे. सीमावर्ती भागातून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी हल्ले कायमचे रोखण्यासाठी पीओके संदर्भात सरकारने योग्य निर्णय घ्यावा. पर्यटन काळात काश्मीर खोर्‍यातील दुर्गम भागातही चोख सुरक्षा व्यवस्था असणे गरजेचे आहे. पहलगाम हल्ला हा थेट दहशतवाद्यांकरवी छेडण्यात आलेले पाकिस्तान पुरस्कृत युद्ध आहे. पुरेसे सुरक्षा रक्षक त्याठिकाणी नव्हते याला सरकार जबाबदार आहे. सरकारवर कोणाचाही अजिबात विश्वास राहिला नाही. सुरक्षा यंत्रणेतील त्रुटी आणि व्यवस्थेतील अपयशाची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. हिंदू नागरिकांमध्ये भावना भडकवण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत आहे, असेही राऊत यांनी प्रसिद्वी पत्रकात नमूद केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उबाठा शिवसेना गटाचे शिवतीर्थावर निषेध आंदोलन
पुढील बातमी
घराच्या अंगणातून मोबाईलची चोरी

संबंधित बातम्या