खटाव येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरु

by Team Satara Today | published on : 03 June 2026


सातारा :  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत खटाव येथे चालवण्यात येणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले मुलीचे शासकीय  वसतिगृहात सन 2026-27 वर्षात प्रवेश देण्याची कार्यवाही सरु झाली आहे. वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसुचित जाती, जमाती, वि.जा. भ.ज. आर्थिक दुर्बल घटक तसेच इतर मागास प्रवर्ग अनाथ, दिव्यांग असणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन गृहपाल, मुलींचे शासकीय वसतिगृह खटाव यांनी केले आहे. 

सन 2026-27चे वसतिगृह प्रवेश हे ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाईन अरेज करण्यासाठी http://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत. हायस्कूल विभागासाठी प्रवेशाचा अंतिमत दिनांक 30 जून 2026 व इयत्ता 11 वी 12वी, बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेशाचा अंतिम दिना्क 15जुलै 2026असा आहे. प्रवेशासाठी मागील वर्षाचे गुणपत्रक, जातीचा दाखला,  उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, दिव्याद दाखला व अनाथ असल्याचा दाखला इत्यादी कागदपतत्रे आवश्यक आहेत. 

सदर वसतगृहात इयत्ता 8 वी पासून पुढील शिक्षण घेणाऱ्या व ज्यांचे  वार्षिक उत्पन्न रु. 2.5 लाख पेक्षा कमी आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार व आरक्षणानुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थ्यांना निवास, भोजन, नाष्टा, दूध, फळे, अंडी, बोर्डिंग साहित्य, शैक्षणिक स्टेशनरी व वह्या पुस्तके मोफत परविलीजातात. तसेच प्रवेशितांना दरमाह एक हजार पन्नास रुपये निर्वाहभत्ता दिला जातो तसेच विद्यालय विभागाच्य सर्व व ज्या महाविद्यालयात गणवेश सक्तीचा आहे. त्या विद्यार्थ्यांना गणवेशासाठी रक्कम दिली जाते. शैक्षणि्क सहल खर्च व जर्नल खरेदीची रक्कम देखील दिली जाते. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदार संघ निवडणुकीसाठी 7 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र वैध
पुढील बातमी
बैलाचे स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून खुनाच्या प्रयत्नासह मारहाणप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे

संबंधित बातम्या