सातारा : अवैधरित्या जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सलीम शब्बीर शेख रा. सदर बाजार, सातारा हा सातारा शहरातील मराठी एजन्सी समोर असलेल्या रस्त्यावर महिंद्रा कंपनीची बोलेरो कॅम्पर टेम्पो मधून अवैधरित्या एका म्हैशीला चारापाणी न ठेवता तिची क्रूरतेने वाहतूक करताना आढळून आला. याप्रकरणी शेख याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पिकअप टेम्पो आणि म्हैस असा 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.