साता-यात शनिवारी प्रभावी पालकत्व या विषयावर संवाद

by Team Satara Today | published on : 20 August 2025



डॉ. आनंद नाडकर्णी हे सुप्रसिध्द मानसोपचार तज्ज्ञ, लेखक, नाटककार, संगीतकार, कवी, रेखाटन कलाकर, इतिहासाचे विद्यार्थी, तत्वज्ञान आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी विविध आव्हानांना तोंड देत वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. 1990 मध्ये त्यांनी मानसिक संस्था सुरु केली. व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात त्यांचे काम अभूतपूर्व आहे. ते मुंबई आणि देशभरातील अनेक उद्योगांसाठी मानसिक आरोग्य, संबंधित विषयांचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. ते देशातील 30 हून अधिक प्रमुख कॉर्पोरेट अधिका-यांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. मराठीत त्यांनी 27 पुस्तके लिहिले आहेत. त्यांनी आणि त्यांच्या टीमने कोविड 19काळात ऑनलाइन, ऑफलाइन मानसिक आरोग्य सेवा सुरु ठेवल्या होत्या. या काळात त्यांनी 450हून अधिक ऑनलाइन वेबिनार आयोजित केले होते. अशा या नामवंत डॉ. नाडकर्णी हे सातारकरांशी संवाद साधणार आहेत. यासाठी प्रवेश विनामूल्य आहे. डॉ. नाडकर्णी यांच्याशी डॉ.स्वाती संदीप श्रोत्री, डॉ.सौ. चैत्राली संकेत प्रभुणे हे संवाद साधणार आहेत. या संवाद कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत आणि डॉ.संकेत प्रभुणे यांनी केले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड शहराच्या सुशोभिकरणासाठी बंद असलेली कारंजी तात्काळ कार्यान्वित करावीत
पुढील बातमी
पूर्ण क्षमतेने भरले कर्नाटकातील अलमट्टी धरण

संबंधित बातम्या