प्रा.रमेश आढाव यांना बहुमताने विजयी करा : राजू शेट्टी

by Team Satara Today | published on : 09 November 2024


फलटण : शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर, सामान्य मध्यमवर्गीय जनता, स्त्रिया वगैरे सर्वच समाज घटकांचे प्रश्न विधानसभेच्या वेशीवर टांगून त्याची सोडवणूक करुन घेण्यासाठी प्रा.रमेश आढाव यांना बहुमताने विजयी करा, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केले आहे.

२५५ फलटण (अजा) विधानसभा मतदार संघातील संविधान समर्थन समिती पुरस्कृत, परिवर्तन महाशक्ती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार ज्येष्ठ पत्रकार प्रा.रमेश आढाव यांच्या निवडणूक प्रचारार्थ माजी खासदार राजू शेट्टी बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, स्वतः उमेदवार प्रा.रमेश आढाव, संविधान समर्थन समितीचे सदस्य व माजी नगरसेवक सचिन अहिवळे, शक्ति भोसले, संग्राम अहिवळे, आदित्य साबळे, विशाल गुंजाळ, महादेव गायकवाड, बाळासाहेब शिपकुले उपस्थित होते.

संविधानाला अभिप्रेत असणारा लोकप्रतिनिधी  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला अभिप्रेत असणारा आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा याचे उत्तम उदाहरण असलेल्या प्रा.रमेश आढाव यांना फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी साथ द्यावी अशी विनंती यावेळी राजू शेट्टी यांनी केली.

आढाव सरांना विजयी करून क्रांती करा :

लोकशाही गिळंकृत करु पाहणाऱ्या प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मतदान या ब्रम्हास्त्राचा वापर करुन प्रा.आढाव यांचे निवडणूक चिन्ह असलेल्या रोड रोलर या चिन्हा समोरील बटण दाबून या मतदारसंघात क्रांती करा आणि त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करा असे आवाहन यावेळी राजू शेट्टी यांनी केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नसांमध्ये बॅड कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढले असेल तर…
पुढील बातमी
पाण्यासाठी आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणाऱ्या आमदाराला मतदार धडा शिकवतील : आ. शशिकांत शिंदे

संबंधित बातम्या