सातारा : शाहूपुरी चौक ते दिव्यनगरी रस्त्यावर संशयास्पदरित्या अंधारात तोंडाला रुमाल बांधून, आपला चेहरा लपवून उभ्या असलेल्या दोघांना शाहूपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.
दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने हे दोघे तेथे उभे असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांना ताब्यात घेतलेले आरोपी संदीप सुरेश पावशे (वय ४५, रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा) आणि सुरज अनिल भोसले (वय ३३, रा. मोरे कॉलनी, सातारा) यांच्याविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल धुमाळ यांनी तक्रार दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार कदम हे करत आहेत.