सातारा : श्वसनास त्रास झाल्याने परजिल्ह्यातील एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 रोजी करमाळा तालुक्यातील एक सहल सज्जनगड येथे आली होती. या सहलीतील एका विद्यार्थिनीस सज्जनगड येथे पोहोचल्यावर श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यात ती बेशुद्ध होऊन खाली पडल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार निकम करीत आहेत.