पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोकणात अनेक वेगवेगळ्या रानभाज्या येतात. रानभाज्या खाणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे अळू. आळूच्या पानांचा वापर करून भाजी, अळू वडी आणि इतरही अनेक पदार्थ बनवले जातात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अळूची पान काढून त्यापासून अळूचं फडफड बनवलं जात. कोकणात या भाजीला विशेष महत्व आहे. तर कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग परिसरात मोठ्या प्रमाणावर अळूची भाजी बनवली जाते. अळूच्या भाजीचे नाव ऐकल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. अळूचं फडफड तांदळाची गरमागरम भाकरी आणि मऊ भातासोबत अतिशय चविष्ट लागते. अळूचं फदफदंहा शब्द ऐकून सगळ्यांचं हसू येते, पण हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर आणि चटकदार लागतो. चला तर जाणून घेऊया अळूचं फदफदं बनवण्याची सोपी रेसिपी.
साहित्य:
⦁ अळूची पान
⦁ लसूण
⦁ शेंगदाणे
⦁ मका
⦁ वाल
⦁ मीठ
⦁ कोकम
⦁ लाल तिखट
⦁ हळद
⦁ कढीपत्त्याची पाने
⦁ मोहरी
तेल
हिरवी मिरची
कृती:
⦁ अळूचं फदफदं बनवण्यासाठी सर्वप्रथम, अळूची पाने स्वच्छ साफ करून घ्या. त्यानंतर पाने धुवून बारीक चिरा. अळूची पाने साफ करताना हातांना तेल किंवा कोकम लावणे गरजेचे आहे. अन्यथा हातानं खाज येण्याची शक्यता असते.
⦁ स्वच्छ धुवून घेतलेला अळू कुकरच्या भांड्यात टाकून त्यात मक्याचे मोठे मोठे तुकडे आणि अर्धा वाटी शेंगदाणे, वाल टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या ५ शिट्ट्या काढा.
⦁ कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात मोहरी, कढीपत्त्याची पाने आणि बारीक चिरून घेतलेला लसूण टाकून भाजून घ्या.
⦁ नंतर त्यात लाल तिखट, हळद आणि गरम मसाला टाकून मसाला भाजा. नंतर त्यात शिजवून घेतलेला अळू टाकून वरून चवीनुसार मीठ टाका.
⦁ अळू शिजल्यानंतर त्यात दोन ते तीन चमचे कोकम आगळ टाकून व्यवस्थित अळूला उकळी काढून घ्या.
⦁ तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेलं अळूचं फदफदं. हा पदार्थ मऊ भातासोबत अतिशय सुंदर लागेल.