श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे बालसंस्कार शिबीर

by Team Satara Today | published on : 05 May 2025


सातारा : येथील श्रीरामकृष्ण सेवा मंडळातर्फे गुरुवार दि. ८ मे ते १३ मे या कालावधीत स्वामी विवेकानंद बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबिरात योगासने, ध्यान, स्त्रोतपाठ, खेळ, नाश्ता, विविध विषयांवर तज्ञांचे मार्गदर्शन, सहल होणार आहे. शिबिरासाठी पहिली ते दहावीपर्यंत मुलांची वयोमर्यादा आहे. शिबीर ८ मे १३ मे या कालावधीत दररोज सकाळी ७ ते ९.३० यावेळेत होणार असून नावनोंदणी दि.७ मे पर्यंत  श्रीरामकृष्ण सेवा मंडळात सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत करावी.  शिबिरासाठी नावनोंदणी ७ मे पर्यंत करायची असून मुलांनी येताना वही-पेन व रुमाल घेऊन यावेत.  श्रीरामकृष्ण सेवा मंडळाच्यावतीने दर रविवारी ९ ते १० बालसंस्कार वर्ग सुरु असतो त्यातही सहभागी होण्याचे आवाहन सेवा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबई इंडियन्सला गुजरात विरूद्धच्या सामन्याआधी मोठा झटका
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याचा बारावीचा निकाल 92.76 टक्के

संबंधित बातम्या