ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात खाते न उघडता बाद झाल्यानंतर यशस्वी जयस्वालने दुसऱ्या डावात दमदार 90 धावा ठोकल्या. आपल्या कारकिर्दीतील 9व्या अर्धशतकासोबत 22 वर्षीय यशस्वी जयस्वालने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. या तरण्याबांड फलंदाजाला खेळताना पाहताना कोणताही ऑस्ट्रेलियन गोलंदाज त्याला त्रास देऊ शकेल असे वाटले नाही. त्याला केएल राहुलनेसुद्धा चांगली साथ दिली.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप 2023-25 च्या चालू चक्रातील यशस्वी जयस्वालच्या बॅटमधून ही 12वी 50+ धावसंख्या आहे. यासह त्याने इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटची बरोबरी केली. पहिल्या डावाच्या जोरावर 46 धावांची आघाडी घेतल्यानंतर यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांची शतकी भागीदारी कायम आहे. अशाप्रकारे टीम इंडियाची आघाडीही 175 धावांच्या पुढे गेली आहे.
भारताच्या सलामीच्या जोडीने 20 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात 100+ धावांची भागीदारी केली आहे. ही भारताची ऑस्ट्रेलियातील तीसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. विशेष म्हणजे, भारताने 2018 आणि 2021 मध्ये सलग बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली, परंतु असे असूनही, पहिल्या विकेटसाठी 100 पेक्षा जास्त धावांची भागीदारी कधीच झाली नाही. शेवटच्या वेळी आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग 2004 मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले होते तेव्हा त्यांनी सिडनीमध्ये 123 धावांची भर घातली होती.
जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजी आक्रमणाचा सामना करत यशस्वी जयस्वालने भारताला दमदार सुरुवात तर दिलीच पण कांगारू गोलंदाजांना डोळ्यासमोर ठेवूनही दमबाजी केली. यादरम्यान युवा यशस्वीने मिचेल स्टार्कचीही स्लेजिंग केली. तो स्टंप माईकमध्ये (इट्स कमिंग टू स्लो) असे म्हणताना ऐकला होता, म्हणजे तुझे बॉल माझ्यासाठी खूप स्लो आहेत.
विकेटवर गवत असूनही बुमराहने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले कारण या विकेटने गोलंदाजांना सीम आणि अतिरिक्त उसळी दिली. भारताच्या युवा आणि अनुभवी फलंदाजांना यजमान गोलंदाजांचा सामना करता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या नितीश रेड्डीने केलेल्या 41 धावा आणि ऋषभ पंतच्या 37 धावा याशिवाय भारताच्या डावात कोणालाच महत्त्वाचे योगदान देता आले नाही. भारतीय संघ 49.4 षटकात 150 धावांवर बाद झाला. मिचेल स्टार्कने 11 षटकात 14 धावा देऊन दोन विकेट घेतल्या तर जोश हेझलवूडने 13 षटकात 29 धावा देत 4 बळी घेतले. ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने 15.4 षटकात 67 धावा देत दोन गडी बाद केले.

मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |
कॅबिनेट मंत्र्यांच्या समन्वयामुळे जिल्ह्याचा होणार विकास |

दगडाने मारहाण प्रकरणी एकाविरोधात गुन्हा |
अपघात प्रकरणी कार चालकावर गुन्हा |
मंगळवार पेठेतून दुचाकीची चोरी |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
शाहूनगरमधील घरफोडीची उकल |