सातारा : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी झाली. फलटण येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
सर्वत्र डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. फलटण येथील शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.
यावेळी जिल्हा संघटक सुधीर राऊत, फलटण तालुकाप्रमुख विकास नाळे, उपजिल्हा संघटक विश्वास चव्हाण, उपजिल्हा संघटक नंदकुमार काकडे, ग्राहक संरक्षण उपजिल्हा संघटक भारत लोहाना, फलटण शहर संघटक अक्षय तावरे, संपर्क संघटिका जाधव मॅडम उपस्थित होत्या.