कृषी सहाय्यक सचिन जाधव यांचा सी.पी.राधाकृष्णन महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते कृषी सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव

by Team Satara Today | published on : 02 October 2024


सातारा : महाराष्ट्र शासनाचा पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवा रत्न पुरस्कार सचिन जाधव कृषी सहाय्यक, फलटण यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व कृषीमंत्री धनंजय मुंढे व प्रधान सचिव जयश्री भोज भा.प्र.से, आयुक्त कृषी रवींद्र बनवडे भा.प्र.से मा कैलास मोते फलोत्पादन संचालक महाराष्ट्र राज्य, तसेच संचालक, विनयकुमार आवटे विकास पाटील, सुनील बोरकर,आणि अंकुश माने सहसंचालक या मान्यवरांच्या उपस्थित मध्ये नॅशनल स्पोर्ट्स क्लब वरळी मुंबई गौरव करण्यात आला.

सातारा जिल्यातील पहिले कृषी सेवा रत्न मिळवण्याचा मान मिळवला आहे. महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च पुरस्कार म्हणून कृषी विभागाकडून दिला जाणरा हा पुरस्कार आहे. या पुरस्कारा बद्दल उमेश पाटील विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर, जिल्हा आधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी सुहास रनसिंग, तालुका कृषी अधिकारी तसेच कृषी पर्यवेक्षक संघटना, कृषी सहाय्यक संघटना तसेच त्याचे वेगवेगळ्या स्तरामधून अभिनंदन केले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना अरुण बोंगीरवार पब्लिक सर्व्हिस एक्सालेन्स अवॉर्ड घोषित
पुढील बातमी
स्वप्नांच्या शोधाचं उलगडणारं रहस्य

संबंधित बातम्या