सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रक्त घटक स्वतंत्र करण्याची सुविधा सध्या टेक्निकल सुपरवायझरच्या नियुक्तीत अडकली आहे. या नियुक्तीनंतरच दिल्लीतून आवश्यक असलेल्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी आवश्यक पदाची तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे.
रक्तामध्ये लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट असे घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनामुळे रक्तातील हे घटक स्वतंत्र करता येणे शक्य झाले आहे. रक्तविघटन प्रक्रियेद्वारे लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट हे तीन घटक वेगवेगळे करून रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार देणे शक्य झाले आहे. त्यामुळे आवश्यकता नसतानाही संपूर्ण रक्त रुग्णाला द्यावे लागत नाही. रक्तक्षय, किडनी व हृदयविकार, तसेच पॅलेस्मियाच्या रुग्णांना रक्त वाढीसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या, तसेच जलोदराचा आजार असलेल्यांना रक्तातील 'प्लाझ्मा' या घटकाची गरज असते, तर डेंगी व कर्करोगाच्या रुग्णांना 'प्लेटलेट' आवश्यक असतात. त्यांना संपूर्ण रक्त देण्याची गरज नसते. आवश्यक तो घटक दिल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होते. मात्र, ही सुविधा खासगी रक्तपेढींमध्येच उपलब्ध आहे. प्रक्रियेसाठी लागणारे यंत्र व इतर खर्चामुळे रक्त घटकांचा दर संपूर्ण रक्तापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना ते घेता येत नाही, तर अनेकांना नाइलाजास्तव हजारो रुपयांचा खर्च सोसावा लागतो.
रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय सुमारे सात वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार रुग्णालयात मशिनही आल्या होत्या; परंतु आवश्यक असणारी इमारत उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी आलेल्या मशिन पुन्हा पुण्याच्या मेट्रो ब्लड बँकेकडे पाठवल्या गेल्या आता इमारती उभी राहून सहा वर्षे झाली आहेत. पाच वर्षांपासून आवश्यक असणारी मशिनरीही उपलब्ध झाली आहे. कोरोना कालावधीत ही प्रक्रिया थंडावली होती; परंतु त्यानंतरही शासकीय पातळीवर ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी दिल्लीतून काही मंजुरी लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी टेक्निकल सुपरवायझर हे पद भरणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाने शासनाशी पत्र व्यवहारही केला आहे; परंतु ते पद अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे मंजुरीसाठी अर्ज करणेच खोळंबले आहे. जिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्या सर्वसामान्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. त्यासाठी तातडीने पद भरतीबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे.संगमनगर येथे घरफोडी; 56 हजारांचे दागिने लंपास |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
दुचाकी अपघातात युवकाचा मृत्यू |
न्या. निकम यांचा अंतरीम जामीन फेटाळला; तात्पुरत्या जामिनावर उद्या सुनावणी |
जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
100 रुपयांच्या कृत्रिम स्टॅम्प टंचाईबाबत भोगावकरांचा एल्गार |
सातारा जिल्ह्यातील धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरू |
निर्यातक्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी रोजगार निर्मिती कार्यशाळा संपन्न |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन जण बेपत्ता |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
नुकसान प्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा |
विवाहितेस जाचहाट केल्याप्रकरणी पतीसह तीन जणांविरोधात गुन्हा |
दूध वाहतूक बंद करण्याचा स्वाभिमानीचा इशारा |
शिवसागर आणि धोम जलाशयात सी प्लेन सुविधा सुरू करावी |
सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सातारा यांना त्वरित निलंबित करण्यात यावे |
साक्षी कादबाने ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये व्यवस्थापकीय पदावर |
लाच मिळविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीशांसह चारजणांविरोधात तक्रार |