भाजप सातारा जिल्ह्याच्या तीन मोर्चांच्या नियुक्ती जाहीर; तेजस्विनी संग्राम घोरपडे, अमित भिसे, वासिम मुल्ला यांचा समावेश

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा : भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा सुरेश भोसले यांनी नव्या जिल्हा कार्यकारिणी मधील महिला मोर्चा, अनुसूचित जाती मोर्चा, आणि अल्पसंख्यांक मोर्चा या तीन मोर्चाच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा केली आहे. या निवडीबद्दल खासदार  उदयनराजे भोसले, नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, नामदार जयकुमारभाऊ गोरे , आमदार  मनोज घोरपडे यांनी अभिनंदन केले. 

महिला मोर्चा अध्यक्षपदी तेजस्विनी संग्राम घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली असून, महिलांचे संघटन मजबूत करण्यासाठी त्यांना काम करावे लागणार आहे. श्री. अमित भिसे यांच्यावर अनुसूचित जाती  मोर्चाची जबाबदारी पुन्हा एकदा देऊन त्यांच्या कामावर आणि संघटन कौशल्यावर  विश्वास व्यक्त करण्यात आला आहे, अनुसूचित जाती मधील सर्व घटकांना एकत्र करून त्यांना संघटन वाढवावे लागणार आहे.   

वासिम शब्बीर मुल्ला यांच्याकडे अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पद देऊन, अल्पसंख्यांक समाजातील कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र करून संघटन वाढवायची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. नव्या-जुन्या कार्यकर्त्यांचा समतोल राखत जिल्हा कार्यकारिणी मधील तीन मोर्च्यांचे अध्यक्ष जाहीर करण्यात आल्याचे  जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी सांगितले.

उर्वरित मोर्चे आणि आघाड्या यांच्या अध्यक्षांच्या या संयोजकांच्या नेमणुका  सुद्धा लवकरच केल्या जातील, अशी माहिती दिलेली जिल्हाध्यक्ष डॉ अतुलबाबा भोसले यांनी दिली. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील विविध विधानसभा मतदारसंघांना प्रतिनिधित्व देत या मोर्च्यांच्या जिल्हा अध्यक्षपदी योग्य उमेदवारांची निवड करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले नव्या संघटनात्मक रचनेमुळे पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास जिल्हाध्यक्ष डॉ. भोसले यांनी व्यक्त केला.आणि नियुक्त  पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने  काम करून पक्ष संघटन वाढवण्याचे आवाहन केले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विद्यार्थ्यांनी केवळ पदवीपुरते मर्यादित न राहता संविधानिक मूल्यांची जोपासना करणारे जबाबदार नागरिक बनावे : प्रा. डॉ. प्रकाश कांबळे
पुढील बातमी
सातारा शहरालगत असलेल्या देशमुख सिटीनजिक आगीचा कहर; अग्निशामक दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

संबंधित बातम्या