अनुकंपा भरती झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार

by Team Satara Today | published on : 06 October 2025


सातारा :  अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना शासन सेवेचे नियुक्तीपत्र मिळण्यास बराच कालावधी लागत होता, परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेल्या 150 दिवसांच्या कार्यक्रमामुळे आम्हाला शासन सेवेतील नियुक्तीपत्रे लवकर मिळाली. यामुळे  आमच्या कुटुंबाला आर्थिक स्थिरता मिळणार आहे, अशा भावना व्यक्त करुन  अनुकंपा तत्वावरील भरती झालेल्या उमेदवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शासन आणि प्रशासनाचे आभार मानले.

अनुकंपा तत्वावरील उमेदवारांना शासन सेवेतील नियुक्तीपत्र देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये सविस्तर असे मार्गदर्शन करुन शैक्षणिक अर्हतेनुसार कोणत्या पदासाठी पात्र आहोत याची सविस्तर माहिती देवून पदाचे पसंती क्रमांक घेतले. शिबीराच्या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहून सर्व बाबतीत मार्गदर्शन करत होते.

अनुकंपाधारकांना नियुक्ती पत्र वेळेत मिळत नाही हा आमचा गैरसमज यामुळे दूर झाला. विहित मुदतीत आमच्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. तसेच आम्हाला आलेल्या अडचणींचे निरसनही अधिकाऱ्यांनी केले. आता आम्ही शासनाचे एक भाग झालो आहोत. पुढील काळात आमच्या पदाचा वापर समाजाच्या हितासाठी करणार असल्याचीही भावना यावेळी अनेक उमेदवारांनी व्यक्त केल्या.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्ट्रॉबेरीवर परतीच्या पावसाचा परिणाम
पुढील बातमी
…लवकरच ग्रामपंचायत प्रशासनाचे कामकाज थेट ऑनलाइन

संबंधित बातम्या