सातारा : परताव्याच्या आमिषाने सुमारे दहा लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2016 ते 2019 या काळात सर्जेराव संभाजी मोटे, त्यांची पत्नी सुरेखा सर्जेराव मोटे दोन्ही रा. म्हसवड, ता. माण, जि. सातारा आणि धनाजी शिवाजी गायकवाड रा. शटफळ, आटपाडी, जि. सांगली व अतुल वसंत गयाळी रा. जवळा, ता. सांगोला, जि. सोलापूर यांनी तुळशीराम रामचंद्र काटकर रा. वडजल ता. माण, जि. सातारा यांच्याकडून तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि इतर लोकांचे नावे आर डी, एफ डी स्वरूपात तसेच बचत गट स्वरूपात सुमारे दहा लाख रुपये अधिक परताव्याच्या आमिषाने घेतले. यानंतर परतावा अगर संबंधित रक्कम न देता संबंधितांची फसवणूक केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केणेकर करीत आहेत.
परताव्याच्या आमिषाने सुमारे दहा लाखांची फसवणूक
by Team Satara Today | published on : 27 January 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
रानडुकराच्या शिकारीप्रकरणी फलटणमध्ये वनविभागाची मोठी कारवाई
August 02, 2026
गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा
August 02, 2026
गोडोलीतील जुगार अड्ड्यावर छापा; तिघांविरुद्ध गुन्हा
July 31, 2026
सातारा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये युवती व महिला बेपत्ता
July 31, 2026
धनगरवाडीत सुमारे 50 हजारांची घरफोडी; अज्ञातावर गुन्हा
July 31, 2026