04:57pm | Oct 01, 2024 |
जम्मू/श्रीनगर: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात मंगळवारी पहिल्या चार तासांत 28.12 टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाने (EC) जारी केलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या या टप्प्यात कडेकोट बंदोबस्तात जम्मू-काश्मीरमधील सात जिल्ह्यांतील 40 विधानसभा जागांवर सकाळी 7वाजता मतदानाला सुरुवात झाली. मतदान केंद्रांबाहेर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. केंद्रशासित प्रदेशातील 39.18 लाखांहून अधिक मतदार 415 उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.
या उमेदवारांमध्ये तारा चंद आणि मुझफ्फर बेग या दोन माजी उपमुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला, बांदीपोरा आणि कुपवाडा या तीन सीमावर्ती जिल्ह्यांमध्येही मतदान सुरू आहे. ज्या विधानसभा मतदारसंघात मतदान होत आहे त्यामध्ये बारामुल्ला जिल्ह्यातील बारामुल्ला, उरी, रफियााबाद, पट्टण, गुलमर्ग, सोपोर आणि वाघोरा-क्रेरी, कुपवाडा जिल्ह्यातील कुपवाडा, कर्नाह, त्रेहगाम, हंदवाडा, लोलाब आणि लंगेट आणि बांदीपोरा जिल्ह्यातील बांदीपोरा, सोनवारी यांचा समावेश आहे. आणि गुरेझ यांचा समावेश आहे. या 16 विधानसभा जागांसाठी 202 उमेदवार रिंगणात आहेत. जम्मू प्रदेशातील उधमपूर, सांबा आणि कठुआ जिल्ह्यातील 24 विधानसभा मतदारसंघातही मतदान होत आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, जम्मू-काश्मीर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 28.12 टक्के मतदान झाले.
उधमपूर जिल्ह्यात सर्वाधिक मतदान
उधमपूमध्ये 33.84 टक्के मतदान
सांबामध्ये 31.50 टक्के
कठुआमध्ये 31.78 टक्के
बांदीपोरामध्ये 28.04 टक्के
जम्मूमध्ये 27.15 टक्के
कुपवाडामध्ये 27.34 टक्के
बारामुल्लामध्ये 23.20 टक्के
सोपोरमध्ये सर्वात कमी मतदान
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, कठुआ जिल्ह्यातील बानी मतदारसंघात पहिल्या चार तासांत ३४.९२ टक्के मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, एकेकाळी दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांचा बालेकिल्ला असलेल्या सोपोरमध्ये सर्वात कमी 17.28 टक्के मतदान झाले.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |