दिल्ली : मागील काही दिवसांपासून निवडणूक आयोगावर आरोप सुरू आहेत. आता विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर चौफेर हल्ला चढवला आहे. लोकसभा निवडणुकीसह अलीकडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाल्याचा आरोप लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी केला आहे. 'आतापर्यंत समोर आलेले प्रकार केवळ हिमनगाचे टोक असून, यापेक्षाही ठोस पुरावे उपलब्ध आहेत,' असा दावा त्यांनी केला.
यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा एक व्हिडीओ दाखवला. यामध्ये दोन्ही नेते 'भाजप आणि एनडीए देशावर प्रदीर्घ काळ राज्य करेल' असा दावा करताना दिसत असून, या विधानांचा निवडणुकीतील हेराफेरीशी थेट संबंध असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी म्हणाले की, मी राजकीय कुटुंबातून आलो आहे. मला माहित आहे की इतका प्रदीर्घ काळ सत्तेत राहण्याचा दावा कोणीही करू शकत नाही. इंदिरा गांधींनी बांगलादेश युद्ध जिंकले आणि त्या लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचल्या. पण अवघ्या काही वर्षांनंतरच त्या निवडणुका हरल्या. असे प्रत्येक पक्षासोबत घडले आहे, पण भाजपसोबत नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
"आम्ही वारंवार सांगत आलो आहोत की इलेक्शनमध्ये समस्या आहेत. मतांचे संरक्षण करणे ही निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. सर्व काही याच्याशी निगडित आहे. जर मतच सुरक्षित नसेल, तर काहीच सुरक्षित नाही."मी काहीही हवेत बोलत नाहीये. यापेक्षाही अधिक पुरावे आहेत, असेही राहुल गांधी यांनी सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाली - राहुल गांधी
राहुल गांधी म्हणाले की, लोकसभा निवडणुका आणि त्यापूर्वीच्या अनेक विधानसभा निवडणुकांमध्ये हेराफेरी झाली होती. मी हे बऱ्याच काळापासून सांगत आहे, पण आता दोन निवडणूक आयुक्तही हेच सांगत आहेत. ज्ञानेश कुमार यांची निवड पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी केली होती, असेही गांधी यांनी सांगितले. मतांच्या चोरीबरोबर कायद्यांचीही चोरी होते. जेव्हा कायदे चोरले जातात, तेव्हा संस्थाही चोरल्या जातात. ही साखळी सुरूच राहते. आज मत गमावले आहे आणि कायदा बनवणारी यंत्रणाही गमावली आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सर्व निवडणुकांमध्ये हेराफेरी केली; राहुल गांधींचा आयुक्तांवर मोठा आरोप, ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावा
by Team Satara Today | published on : 24 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा