जुन्या वादातून एकास कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण; दोन जणांविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 02 July 2026


सातारा : जुन्या वादातून एकास मारहाण केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास सचिन वंजारी (रा. गुरुवार पेठ, सातारा) यांना जुन्या वादाच्या कारणातून प्रीतम उर्फ प्रतीक उर्फ बंटी सोमनाथ साळुंखे, मानव नवनाथ जाधव दोन्ही (रा. राजसपुरा पेठ, सातारा) यांनी वंजारी यांना त्यांच्या राहत्या घरासमोरून जबरदस्तीने मोटरसायकल वरून आंबेदरे परिसरात नेऊन त्या ठिकाणी कोयता व लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे. याबाबतची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटोळे करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू; सातारा तालुका पोलीस ठाण्यात नोंद
पुढील बातमी
महामार्गावरील भरतगाववाडी गावच्या हद्दीत ट्रक चालकाला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी; अज्ञात चोरट्यांवर गुन्हा

संबंधित बातम्या