सातारा : सदरबाजार येथे ऐश्वर्या तानाजी धेंडे यांच्या नवीन घराच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून घरामध्ये जबरदस्तीने प्रवेश करून घरातील साहित्यचे नुकसान केल्याप्रकरणी १२ जणांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यामध्ये साजिद अली अहमद शेख, अल्लामद नरून हसन शेख, राशीद अल्लाहमद शेख, गाजिया शेख, रोशन शेख, नाझिया शेख व इतर कुटुंबातील नातेवाईक अशा दहा ते बारा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील सर्वांनी ऐश्वर्या धेंडे यांच्या घरामध्ये अनाधिकृतपणे जबरदस्तीने कुलूप तोडून प्रवेश केला आणि घरातील सर्व साहित्य बाहेर टाकून त्यातील सामानाचे नुकसान केले. हे घर आमचे आहे, आम्ही कुठेही जाणार नाही, तुम्हाला काय करायचं आहे ते करा अशी धमकी देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करत आहेत.