सातारा : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क जकातवाडी, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने २५ जुलै जकातवाडी, ता. जि. सातारा येथे नालसा, मालसा योजना, एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे, नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव निना बेदरकर, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड. सुचित्रा घोगरे काटकर, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ सोशल वर्क प्राचार्या डॉ. शॉली जोसेफ, जीवन बोराटे, संकेत माने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाध्ये सचिव निना बेदरकर यांनी नालसा, मालसाच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर अॅड. सुचित्रा घोगरे काटकर यांनी एडीआर पध्दती आणि त्याचे फायदे व नागरिकांची मुलभूत कर्तव्ये या विषयांवर सखोल मार्गदर्शन केले.