कॉंग्रेस पदाधिकार्‍याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे

by Team Satara Today | published on : 09 October 2024


सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत राज्य सरकारकडून पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जात आहेत. सध्या दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. मात्र सातार्‍यात या योजनेचा बोजवारा उडाला असून सातारा जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई यांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे टप्प्याटप्प्याने पाच हप्त्याचे तब्बल साडेसात हजार रुपये जमा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

यापूर्वीही राज्यात काही ठिकाणी ही योजना राबवताना गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले होते. दिवाळीनिमित्त सरकारकडून भाऊबीज दिली जात आहे. त्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबर अशा दोन महिन्यांचे पैसे एकत्र जमा केले जात आहेत. 10 ऑक्टोबर पर्यंत हे पैसे दिले जाणार होते. परंतु ठरलेल्या तारखेच्या आधीच एक दिवस सरकारने भावाच्या खात्यात पैसे पाठवून चक्क भावालाच भाऊबीजेची उलट ओवाळणी राज्य सरकारने दिल्याचे समोर आले आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने
पुढील बातमी
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती

संबंधित बातम्या