सातारा : शहरासह तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरातील एका अल्पवयीन मुलीच्या बेपत्ता प्रकरणी प्रेम यादव, ज्योती यादव, शंकर यादव आणि प्रांजल यादव यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 10 जून रोजी सकाळी घरातून बाहेर पडलेली मुलगी परत न आल्याने तिच्या वडिलांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मुलीला फूस लावून नेल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक मोहोड तपास करत आहेत.
दुसर्या घटनेत, शहरातील एका उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी 10 जून रोजी घरातून बाहेर पडून बेपत्ता झाली. तिच्या आईने अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला.