सातारा : दुकानासमोर पार्क केलेल्या दुचाकीची अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 जून रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जयश्री अंकुश पवार रा. कात्रज, गोकुळ नगर, पुणे यांची स्प्लेंडर मोटरसायकल अज्ञात चोरट्याने महिंद्रा हॉटेल शेजारी असणार्या फरशी कारखाना दुकानासमोरून चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मोरे करीत आहेत.