सातारा : अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास दिलीप कृष्णा माने रा. अमरलक्ष्मी चौक, कोडोली, ता. सातारा हे त्यांच्या सायकलवरून देगाव ते सातारा रस्त्याने येत असताना स्वप्नपूर्ती बंगल्यासमोर अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनचालका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.