08:16pm | Jan 25, 2025 |
सातारा : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणी येसूबाई साहेब या इतिहासातील सर्व व्यक्तिरेखा म्हणजे महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान आहे. उभ्या भारताची अस्मिता आहे. मात्र मालिका - चित्रपटांमध्ये या व्यक्तिरेखांचे सादरीकरण मनोरंजक पद्धतीने केले जातंय. फक्त टीआरपी वाढवणे या उद्देशाने इतिहासाची अत्यंत घृणास्पद मोडतोड चालवलीय. सिनेमटिक लिबर्टीच्या नावाखाली चाललेले ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचे हे चारित्र्यहनन आम्ही कदापी खपवून घेणार नाही, असा इशारा देत छावा चित्रपटातील आक्षेपार्ह भाग वगळल्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. जर तसे झालेच तर राज्यभर टाळ ठोक आंदोलन छेडून थिएटर बंद पाडू, असा आंदोलनात्मक पवित्रा महाराणी येसूबाई फौडेशनचे सर्वेसर्वा सुहास राजेशिर्के यांनी आज जाहीर पत्रकार परिषदेद्वारे व्यक्त केला.
सुहास राजेशिर्के पुढे म्हणाले, नुकताच छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा हा चित्रपट येऊ घातला आहे. याचा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला. यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची व्यक्तिरेखा अत्यंत उथळपणे मांडलेली दिसून येते. त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या पट्टराणी महाराणी येसूबाई साहेब यांची व्यक्तिरेखा देखील वास्तवाला धरून नाही. या टीझर मध्ये काही गाण्याचा भाग दाखवला आहे. ज्यात दस्तरखुद्द छत्रपती संभाजी महाराज जिरेटोप घालून आपल्या पट्टराणी समवेत लेझीम या पारंपारिक महाराष्ट्राची बाज असणार्या खेळातून नाचताना दाखवलेले आहेत. वास्तविक पाहता लेझीम हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक खेळ नसून कधीकाळी तो एक व्यायाम प्रकार म्हणून प्रसिद्ध होता. कदाचित चित्रपटाच्या दिग्दर्शकांचा याबाबत अभ्यास नसावा.
छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक ज्या प्रतिकूल परिस्थितीत झाला, त्या परिस्थितीचा अभ्यास दिग्दर्शकांनी करायला हवा होता. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यूनंतर सत्तेसाठी चाललेले महाभारत, स्वकियांनी आणि परकियांनी टाकलेले डाव छत्रपती संभाजी महाराजांनी उधळून लावले. अत्यंत कठोर निर्णय घेत स्वतःविरुद्ध चाललेला कट हाणून पाडत आपला राज्याभिषेक करून घेतला. या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार केला तर छत्रपती संभाजी महाराजांचे लेझीम डान्स तसेच फिल्मी हिरो स्टाईलने कपडे झटकण्याची लकब या गोष्टी कधीही वास्तवाला धरून दिसत नाहीत. राज्याभिषेकानंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत असंख्य संकटांना छत्रपती संभाजीराजांना तोंड द्यावे लागले. कधी स्वकियांचा, तर कधी परकीयांचा बिमोड करावा लागला. त्यासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले. या सगळ्या धामधुमीत त्यांना असले नाचकाम करायसाठी सवड तरी मिळाले असेल का ? हा प्रश्न उद्भवतो.
दुसरा मुद्दा आहे तो छत्रपती संभाजी महाराजांच्या पत्नी येसूबाई साहेबांचा. येसूबाई साहेब या तर स्वराज्याच्या कुलमुखत्यार म्हणून नेमणुकीत होत्या. त्यांनी संभाजी महाराजांना अत्यंत धीरगंभीरपणे साथ दिली. संकटसमयी, अनेक बिकट प्रसंगात त्यांना सावरले. तत्कालीन मराठा समाजात सर्वसामान्य स्त्री-पुरुषांचे एकत्र नाचकाम कधी होत असेल, अशी आपली परंपरा नाही. मग या तर स्वतः कुलमुखत्यार तसेच छत्रपतींच्या पट्टराणी होत्या. त्यामुळे या चित्रपटामध्ये दाखवलेला असला खुळचट प्रकार घडला असेल, यावर महाराष्ट्रातील जनता कधीच विश्वास ठेवणार नाही. येसूबाई साहेबांचे स्वराज्यासाठी असलेले योगदान, त्यांनी केलेला त्याग या सर्व गोष्टीचा गांभीर्याने विचार करून त्यांची व्यक्तिरेखा या चित्रपटात अधिक प्रभावीपणे मांडता आली असती. परंतु चित्रपट निर्माता, दिग्दर्शकाने फक्त आणि फक्त मनोरंजन एवढाच विचार करून या चित्रपटाची मांडणी केलेली दिसते, असेही शेवटी सुहास राजेशिर्के यांनी स्पष्ट केले.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
महिलांच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
सातारा शहर परिसरातील तीन जुगार अड्ड्यांवर छापे |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
पन्हाळा परिसरातून आवळल्या कोंडवे गोळीबार प्रकरणातील तीन जणांच्या मुसक्या |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या अग्नीशस्त्र विक्री प्रकरणी तीन युवकांना अटक |
कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या सोडत पध्दतीवर अभिप्राय नोंदविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन |
रिदमिक व ट्रॅडिशनल योगासन स्पर्धेमध्ये सई ढाणेचे यश |
विठुरायाचे आता थेट दर्शन मिळणार |
सातारा जिल्ह्यातील अपशिंगे येथे युद्ध स्मारक उभारणार : माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराज देसाई |
गणिताच्या संपादणूकीत सातारा राज्यात अव्वल |
महिलेस धमकी दिल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून सुमारे सव्वा लाखांची फसवणूक |
जरंडेश्वर नाका परिसरात चैन स्नॅचिंग |
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
मंगळवार पेठेत साठ हजारांची घरफोडी |
देऊर येथील दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी |
कोंडवे येथील गोळीबार प्रकरणातील एकास अटक |
बिबट्याच्या शिकारीचा प्रयत्न करणारे पाचजण ताब्यात |