सातारा : तालुक्यातील निगडी येथून प्रीदोष अप्पासाहेब पवार (वय 37) हे राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत. ते अद्याप परत न आल्याने वडील आप्पासाहेब कृष्णाता पवार (वय ६६) यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दिली आहे. तर सदरबाजार येथील जय मल्हार हाऊसिंग सोसायटी येथून ७४ वर्षीय रवींद्र शंकरराव राऊत हे घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत. याची मिसिंगची फिर्याद मुलगा कपिल राऊत यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
तसेच शाहूनगर गोडोली येथे भाड्याच्या घरात राहणारे प्रमोद जगदीश पाल (वय ४०) यांनी त्यांचे साडू मीरा प्रमोद पाल (वय ३६), मोठी मुलगी समीक्षा आनंद कांबळे (वय १८) आणि लहान मुलगी मानसी प्रमोद पाल (वय १४ सर्व रा. शाहूनगर, गोडोली,सातारा) त्यांच्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले असल्याची मिसिंगची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करत आहेत.