चेन स्नॅचर्सचा सातार्‍यात धुडगूस; दोन महिलांच्या गळ्यातील ऐवज लंपास, सातारा तालुका व सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

by Team Satara Today | published on : 03 August 2026


सातारा : चेन स्नॅचर्सचा सातार्‍यात धुडगूस सुरु असून आणखी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचा ऐवज चेन स्नॅचर्सनी लंपास केला आहे. सातारा तालुका व सातारा शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, छाया विजय देशमुख (वय 68, रा.सैदापूर ता.सातारा) यांनी तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. 30 जुलै रोजी ही घटना घडली आहे. दुचाकीवरुन आलेल्या चेन स्नॅचरने त्यांच्या गळ्यातील 1 लाख 15 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मिनीमंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. नातवासह वृध्द महिला पायी जाच असताना ही घडली आहे.

दुसरी तक्रार सोनाली विजय वाघेला (वय 29, रा. गोडोली, सातारा) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. ही घटना दि. 23 जुलै रोजी घडली आहे. त्यांच्या गळ्यातील 80 हजार रुपये किंमतीचे मिनी मंगळसूत्र स्नॅचरने जबरदस्तीने हिसकावून चोरुन नेले. त्यांच्या घरी लहान बाळ असल्याने व त्याला पाहण्यासाठी कोणी नसल्याने तक्रार देण्यास उशीर झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हरवलेल्या तीन अल्पवयीन मुलांचा 24 तासांत शोध; वाई गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी; समुपदेशनानंतर मुले पालकांच्या ताब्यात
पुढील बातमी
प्रधानमंत्री पीक विमा योजनेस 10 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ; जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी अजय शेंडे यांची माहिती

संबंधित बातम्या