फलटण : येथील केबी उद्योग समूहातील कर्मचाऱ्यांच्या तसेच शेतकरी शेतमजूर व्यवसायिक यांच्या आर्थिक विकासासाठी युवा उद्योजक सचिन यादव यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या गॅलेक्सी को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी संस्थेस पुणे जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी मिळाली असून अल्पावधीत संस्थेने पारदर्शक कारभार करून नावलौकिक प्राप्त केला आहे. आर्थिक निकषांचे तंतोतंत पालन केल्याने संस्थेस 2023 24 या आर्थिक वर्षात ऑडिट वर्ग अ प्राप्त झाला असल्याची माहिती संस्थेचे संचालक हेमंत खलाटे यांनी दिली.
पाच वर्षांपूर्वी गॅलेक्सी पतसंस्थेची स्थापना झाली होती स्थापनेपासून पारदर्शक व सभासदाभिमुख कारभार करून संस्थेने ग्राहक विश्वास संपादन केला आहे. सहकारातील कायदे निकषांचे पालन करीत ग्राहक सभासदांना गरजेनुसार कर्जाची उपलब्धी करून दिली जाते. अल्प तसेच दीर्घकालीन बचतीचे माध्यमातून आर्थिक समृद्धी साठी विविध योजना सुरू केल्या आहेत.
गॅलेक्सी कुटुंबाचे आधारस्तंभ असलेल्या केबी उद्योग समूहाचे कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर तथा छोटे व्यापारी यांच्यात आर्थिक शिस्त निर्माण करण्यात संस्थेचे संस्थापक युवा उद्योजक सचिन यादव संस्थेच्या संचालकांच्या सहकार्याने व कर्मचाऱ्यांच्या परिश्रमी योगदानातून यशस्वी झालेत. ग्राहक सभासद हिताची पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून जोपासना होत असल्याने गॅलेक्सी चा ग्राहक वर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात गॅलेक्सी पतसंस्थेचा नावलौकिक सर्व दूर पोहोचला आहे. कार्यक्षेत्र वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व निकषांस पात्र असल्याने संस्थेस पुणे जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारास परवानगीही मिळाली आहे.
ऑडिट वर्ग अ च्या माध्यमातून सर्वोत्तम आर्थिक संस्था असल्याचे सहकार खात्याकडून मिळालेले प्रमाणपत्र तसेच पुणे जिल्ह्यात कार्यक्षेत्र विस्तारास मिळालेली परवानगी पाहता भविष्यात गॅलेक्सी को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चा नावलौकिक निश्चितच राज्यभर पोहोचेल, असा विश्वास संस्था समूह गट व्यक्त करीत आहेत.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |