01:02pm | Sep 04, 2024 |
मुंबई : एसटी कामगारांचा संप मोडून काढण्यासाठी महामंडळ कंत्राटी चालकांची भरती करणार एसटी कामगारांच्या अकरा संघटनांच्या कृती समितीने 3 सप्टेंबरपासून काम बंद आंदोलन सुरु केले आहे. ऐन गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कामगार संपावर गेल्याने गणपती जादा वाहतूक अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राज्यातील 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान, दुपारी संपाची व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
आज बुधवारी दुपारी 12 पर्यंत एसटीच्या राज्यभरातील 251 आगारापैकी 96 आगार पूर्णतः बंद आहेत. 82 आगार अंशतः सुरू आहेत. तर 73 आगारातील वाहतूक सुरळीत सुरू आहे. तरी गणपतीच्या सणाला जर आरक्षित प्रवाशांना जर बसेस उपलब्ध नाही झाल्या किंवा बस चालकांअभावी सुटल्या नाहीत तर एसटीच्या विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो. त्यामुळे एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी राज्य कर्मचाऱ्यांचा दर्जा आणि वेतन मिळावे या प्रमुख मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले आहे. काल पासून एसटीच्या अनेक आगारातून कामगारांना काम बंद ठेवले आहे.एसटी महामंडळाच्या अकरा कामगार संघटनाच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनामुळे काल 3 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत 251 आगारापैकी 35 आगार पुर्णतः बंद झाले होते. बाकीचे आगार अंशतः अथवा पुर्णतः सुरू असल्याचे म्हामंडळाने स्पष्ट केले होते. एसटीच्या 11 कामगार संघटनांच्या कृती समितीने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आता एसटी महामंडळाने गणपती सणाच्या जादा वाहतूकीला अडचण येऊ नये यासाठी करार पद्धतीने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
मराठवाडा आणि खान्देशात मोठा फटका : एसटी संपाचा जादा प्रभाव मराठवाड्यात ( 26 आगार पुर्णतः बंद ) आणि खान्देशात (32 आगार पुर्णतः बंद) पसरला आहे. मुंबई-पुणे मार्गावरील ई- शिवनेरी बस सेवा सुरळीत सुरू आहे.तरीही संपाबाबत तोडगा न निघाल्यास एसटीची गणपती वाहूतक अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज बुधवारी सकाळी 8 वाजेपर्यंत राज्यभरातील एसटीच्या 251 पैकी 63 आगार पुर्णतः बंद होते. 73 आगारांमध्ये अंशतः वाहतूक सुरू होती. तर 115 आगारामध्ये पुर्णतः वाहतूक सुरळीत सुरू होती.
आज बैठक होणार : एसटी प्रशासन वारंवार संपकरी कर्मचार्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. प्रवाशांची सणासुदीमध्ये गैरसोय करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे. सर्वाधिक गैरसोय आज जाणाऱ्या गणेश भक्तांची होऊ शकते. सुमारे एक हजार एसटी बसेस मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून आज रवाना होत आहेत. दुर्दैवाने संपामुळे बाहेरच्या विभागातून तितक्या बसेस उपलब्ध न झाल्यास चाकरमान्यांची गैरसोय होऊ शकते. त्यामुळे आज दुपारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थिती कामगार कृती समितीची बैठक होत आहे.
गणपतीच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता : येत्या सात सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबई, ठाणे आणि पालघर विभागातून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी पहिली पसंती एसटीला दिली आहे. त्यामुळे4200 ग्रुप आरक्षणासह एकूण 4953 जादा बसेस आतापर्यंत फुल्ल झाल्या आहेत. मुंबईतून कोकणात गणपती उत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाने यंदा 3 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान 5000 जादा बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे. विशेष म्हणजे व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के, ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना 50 टक्के तिकिट दरात सवलत आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |
गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |