जेष्ठ पत्रकार राजेंद्र भागवत यांचे अपघाती निधन

by Team Satara Today | published on : 31 August 2025


फलटण : फलटण तालुक्यातील फुले, शाहू, आंबेडकर विचारांचे पाईक दैनिक ऐक्यचे जेष्ठ पत्रकार सामाजिक विचारवंत राजेंद्र भागवत (वय ५८) यांचे अपघाती निधन झाले.

गोखळी, तालुका फलटण सारख्या ग्रामीण भागातून पुढे येऊन त्यांनी अनेक चळवळीमध्ये भाग घेतला होता. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. माजी आमदार कैलासवासी चिमणराव कदम यांचे ते कट्टर समर्थक होते.

पत्रकारितेमध्ये सुद्धा त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला होता. अनेक जनतेचे प्रश्न वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडून त्यांनी सोडविले होते. फलटण ग्रामीण पत्रकार संघाचे ते माजी अध्यक्ष होते. काल सकाळी नातीला सोडण्यासाठी ते मोटार सायकलवरून शारदानगर (माळेगाव) येथे जात असताना त्यांचा अपघातात मृत्यू झाला.

त्यांच्या पश्चात पत्नी, ३ विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे. दोन मुले पोलीस खात्यात असून १ मुलगा फलटण एसटी आगारात वाहक आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
निलेश फाळके यांची मंत्रालयीन उपसचिव पदावर पदोन्नती
पुढील बातमी
राहत्या घरातून महिला बेपत्ता

संबंधित बातम्या